E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
‘स्टार्ट अप्स’ना १०३ दशलक्ष डॉलर्सचा निधी
Samruddhi Dhayagude
20 May 2025
वृत्तवेध
गेल्या एका आठवड्यात भारतीय ‘स्टार्ट अप्स’नी २५ करारांद्वारे १०२.९३ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. यामध्ये सुरुवातीच्या आणि वाढीच्या टप्प्यातील सौद्यांचा समावेश आहे. बंगळुरू आणि दिल्ली-एनसीआर स्थित ‘स्टार्टअप्स’नी प्रत्येकी सात करारांसह निधीच्या शर्यतीत आघाडी घेतली. त्यानंतर मुंबई आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. ‘क्लीनटेक’, सायबरसुरक्षा, ‘एडटेक’ आणि ‘हेल्थटेक’ ही क्षेत्रे निधी मिळालेल्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक होती, जी भारतातील नवोपक्रम आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूकदारांची आवड दर्शवते.
‘हेल्थटेक स्टार्टअप्स’नी चार डील्ससह निधी प्राप्तकर्त्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर ई-कॉमर्स आणि फूडटेक कंपन्या आहेत. त्यांनी प्रत्येकी तीन डील्स मिळवले. मीडिया आणि मनोरंजन, ‘प्रॉपटेक’, ‘एडटेक’, ‘सॉफ्टवेअर ज अ सर्व्हिस’ आणि इतर कंपन्यांनीही निधी मिळवला. वाढीच्या टप्प्यातील निधीमध्ये आघाडीवर ‘क्लीनटेक’-आधारित ‘एनबीएफसी मेटाफिन’ होते. त्याने आपल्या सिरीज ए फेरीमध्ये दहा दशलक्ष डॉलर निधी उभारला. वाढीच्या टप्प्यातील निधी संकलनात सायबर सुरक्षा फर्म ‘क्विन्यू लॅब्स’चा समावेश आहे. या कंपनीने सात दशलक्ष उभारले आणि ‘निओबँकिंग स्टार्टअप कॅलिडोफिन’ने पाच दशलक्ष डॉलरचा निधी उभारला. ‘एडटेक प्लॅटफॉर्म कॉलेजदेखो’ आणि सागरी सेवा कंपनी ‘सद्भाव ऑफशोअर’नेही निधी उभारला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील निधीमध्ये ‘ब्युटी टेक आणि डिस्कव्हरी प्लॅटफॉर्म कल्ट’ने वीस दशलक्ष डॉलर्स उभारले आहेत.
हा आठवड्यातील सुरुवातीच्या टप्प्यातील सर्वात मोठा निधी करार बनला आहे. ‘सास’ स्टार्टअप फ्यूजने १२.२ दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात निधी उभारणार्या इतर ‘स्टार्टअप्स’मध्ये ‘हेल्थटेक प्लॅटफॉर्म हेक्साहेल्थ’ आणि फूडटेक कंपनी अन्वेषण यांचा समावेश आहे. निधी प्राप्तकर्त्यांमध्ये ‘एआय’ आधारित इंग्रजी शिक्षण प्लॅटफॉर्म ‘स्टिम्युलर’, ‘कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्म मुगाफी’ आणि इतरांचा समावेश आहे. याशिवाय ‘हेल्थटेक स्टार्टअप एकिनकेअर’ आणि ऑफलाइन सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असलेल्या ‘जॅम’ यांनी निधी उभारला आहे. तथापि त्यांनी रक्कम जाहीर केलेली नाही. हे करार भारतातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या वाढत्या आवडीचे प्रतिबिंब आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात २२ भारतीय स्टार्टअप्सनी सुमारे ११२.३५ दशलक्ष डॉलरचा निधी उभारला होता. यामध्ये वाढीच्या सहा टप्प्यांमधील गुंतवणूक आणि सुरुवातीच्या बारा टप्प्यांमधील करारांचा समावेश होता.
Related
Articles
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
स्वित्झर्लंडमध्ये भूस्खलनामुळे एक गाव बर्फात गाडले गेले
30 May 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
30 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी